खंडाळा :परिसरातील वाहतूक व्यवस्था दिवसेंदिवस बिघडत असून, नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. याच पार्श्वभूमीवर सातारा प्राईम न्यूज विशेष “पंचनामा वाहतुकीचा” या उपक्रमाच्या माध्यमातून या प्रश्नांवर सखोल प्रकाश टाकणार आहे. वाढती वाहतूक कोंडी, अवैध वाहतूक, बेकायदेशीर विद्यार्थी वाहतूक, आणि स्कूल बसेसच्या नियमभंगामुळे येथील वाहतुकीची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत चालली आहे.
या समस्यांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस प्रशासन, आरटीओ, शाळा प्रशासन आणि स्थानिक वाहतूकदार यांनी ठोस उपाययोजना राबवण्याची गरज आहे. सातारा प्राईम न्यूजच्या या विशेष “पंचनाम्या”द्वारे प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला जात आहे.
नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा
या उपक्रमात स्थानिक नागरिक, विद्यार्थी, पालक आणि वाहनचालक यांनी आपले अनुभव, समस्या आणि सूचना मांडाव्यात. आपल्या सहभागानेच हा प्रश्न अधिक गांभीर्याने घेतला जाईल.
संपर्क संपादक: जीवन सोनवणे 7770020202/7719020202
सातारा प्राईम न्यूजसोबत राहा आणि “पंचनामा वाहतुकीचा” मधील प्रत्येक अपडेटसाठी वाचत राहा!