खंडाळा दि.२५ ऑगस्ट : खंडाळा तालुक्यातील भोळी या छोट्याश्या गावातून आलेले आणि आपल्या जिद्द,परिश्रम, चिकाटीच्या जोरावर महाराष्ट्र प्रशासनात उच्च पदावर पोहोचलेले आयएएस अधिकारी संजयसिंह चव्हाण यांची नुकतीच परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाली आहे. जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती झाल्याने त्यांच्या मुळगावी गावी आनंद व्यक्त करण्यात येत आहे.
संजयसिंह चव्हाण यांचे १० वी पर्यंतचे शिक्षण न्यू इंग्लिश स्कूल, भोळी येथे पूर्ण केले. राजेंद्र विद्यालय, खंडाळा येथून ११ वी आणि १२ वी उत्तीर्ण झाल्यानंतर त्यांनी पुणे येथील वाणिज्य महाविद्यालयात बी. कॉम ची पदवी मिळवली. पुढे कायद्याचे शिक्षण त्यांनी आयएलएस लॉ कॉलेज पुणे येथे पदवी घेतली. १९९१ मध्ये त्यांची विक्रीकर निरीक्षक, १९९३ मध्ये उपजिल्हाधिकारी म्हणून काम केले. याआधी ते मुंबई येथे अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक या पदावर कार्यरत होते. आता परभणी जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून त्यांच्याकडे पदभार सोपवण्यात आली आहे.