खंडाळा दि. १८ ऑगस्ट: खंडाळा तालुक्यातील पारगाव येथे विजेच्या तारेचा धक्का लागून एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही घटना १८ ऑगस्ट रोजी दुपारी ३:३० च्या सुमारास घडली.
मृत व्यक्तीचे नाव नागेश बबन पवार (वय २७, रा. पारगाव, ता. खंडाळा, जि. सातारा) प्राथमिक माहितीनुसार खंडाळा तालुक्यातील पारगाव गावातील महादेवनगर येथे विजेच्या वाहिन्या झाडांना चिकटत होत्या त्यामुळे दुपारी ३:३० च्या सुमारास हा तरुण झाडांच्या फांद्या तोडण्यासाठी गेला असता या तरुणाला विजेचा धक्का लागला व बेशुद्ध अवस्थेत खाली पडला यावेळी उपस्थित नागरिकांकडून तरुणाला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले परंतु विजेचा दाब तीव्र स्वरूपाचा असल्यानेचा त्याचा मृत्यू झाला. सदर घटनेची माहिती खंडाळा पोलिसांना मिळताच पंचनामा व प्राथमिक माहितीसाठी पोलिस घटनास्थळी व रुग्णालयात पोहोचले, नागेश हा पारगाव खंडाळा येथील महादेवनगर या भागात वास्तव्यास होता नागेश हा प्राणीमित्रांवर प्रेम करणारा एक उत्कृष्ट सर्पमित्र म्हणून नावरूपाला आला होता या घडलेल्या ह्रुदयद्रावक घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे पुढील तपास पोलिस हवालदार जाधव करत आहेत.