• About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact
Satara Prime News
  • ताज्या-बातम्या
  • महाराष्ट्र
    • पश्चिम-महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • खान्देश
    • विदर्भ
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • संपादकीय
No Result
View All Result
  • ताज्या-बातम्या
  • महाराष्ट्र
    • पश्चिम-महाराष्ट्र
    • कोकण
    • मराठवाडा
    • खान्देश
    • विदर्भ
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • संपादकीय
No Result
View All Result
Satara Prime News
No Result
View All Result
Home क्राईम

पोलिस निरीक्षकांचा एसी केबिन थाट, अवैध व्यावसायिकांसोबत मेजवानी ” कायदा झोपेत! भाग ३

कायद्याची आणि लोकशाही मूल्यांची सरळ थट्टाच

Admin by Admin
June 25, 2025
in क्राईम, खंडाळा
0
पोलिस निरीक्षकांचा एसी केबिन थाट, अवैध व्यावसायिकांसोबत मेजवानी ” कायदा झोपेत! भाग ३
0
SHARES
317
VIEWS
Share on WhatsAppShare on FacebookShare on Telegram

शिरवळ (ता. खंडाळा) | शिरवळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक सध्या चर्चेचा आणि जनतेच्या रोषाचा केंद्रबिंदू बनले आहेत. पोलीस निरीक्षक पदाच्या प्रतिष्ठेला मुरड घालणाऱ्या त्यांच्याकडून सेवा निष्ठेपेक्षा थाट मांडण्याला जास्त महत्त्व दिले जात असल्याची जोरदार चर्चा परिसरात सुरू आहे.

सर्वसामान्य नागरिकांकडून जर हेल्मेट न वापरणे, नंबरप्लेट नसलेली दुचाकी चालवणे असे प्रकार घडले, तर लगेच दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु याच पोलीस निरीक्षकांनी स्वतःच नंबरप्लेट नसलेल्या दुचाकीवरून वावरण्याचे दृश्‍य पाहायला मिळाल्याने, कायदा सर्वांसाठी सारखाच असावा हा नियमच त्यांच्या बाबतीत लागू होत नाही, हे स्पष्ट होते. ही दुहेरी भूमिका म्हणजे कायद्याची आणि लोकशाही मूल्यांची सरळ थट्टाच म्हणावी लागेल.

पोलिस स्टेशन मध्ये एसी लावण्यास बंदी असताना व कोणती परवानगी नसताना निरीक्षकांच्या केबिनमध्ये एसीची थंड हवा, बंद दरवाजे आणि भेटीसाठी प्रोटोकॉल – सामान्य जनतेसाठी हीच आता पोलिसांची प्रतिमा उरली आहे. नागरिकांनी तक्रार नोंदवायची म्हटली, तर अनेक पायऱ्या, परवानग्या आणि शेवटी मिळणारी वागणूक तीही संशयाच्या नजरेने! हा पोलीस ठाणे आहे की राजकीय दरबार, असा प्रश्न अनेकांना पडतो.

या प्रकरणात आणखी गंभीर बाब म्हणजे, संबंधित निरीक्षकांचे स्थानिक अवैध व्यावसायिकांशी घनिष्ठ स्नेहसंबंध. काही दिवसांपूर्वी एका खासगी हॉटेलमध्ये त्यांच्यासोबत झालेल्या मेजवानीत काही कुख्यात व्यक्तींचाही सहभाग असल्याचे वृत्त समोर आले आहे. कायद्याचे रक्षकच जर गुन्हेगारीच्या सावलीत बसले, तर न्याय कुणाकडून मागायचा?

या ठाण्याची आणखी एक दाहक वास्तव म्हणजे – जो नागरिक फिर्याद घेऊन येतो, त्यालाच संशयित गुन्हेगारासारखी वागणूक दिली जाते. त्याला प्रश्नांच्या फैरी झेलाव्या लागतात, वेळा मागितल्या जातात आणि तक्रार नोंदविणे जणू शिक्षा भोगण्यासारखे वाटू लागते. परिणामी, नागरिकही तक्रारी नोंदवण्यापेक्षा गप्प राहणे पसंत करतात.

दरम्यान, शिरवळ पोलिस ठाण्यातील दाखल गुन्ह्याची माहिती प्रसार माध्यमांना न देण्याचा आणि त्यांच्या पासून संबंधित माहिती लपविण्याचा नवीनच पायंडा संबंधित पोलिस निरीक्षकांनी मांडला आहे. तर प्रसिद्धीच्या हव्यासापोटी फक्त एखाद्याच चांगल्या कामाची प्रेस नोट तयार करून पाठवण्याचे काम मात्र तत्परतेने केले जाते.

‘सातारा प्राईम न्यूज’ने पोलिस निरीक्षकांच्या निष्क्रियतेवर व त्यांच्या काही प्रकरणावर प्रकाश टाकताच, पोलीस निरीक्षकांनी अवैध व्यवसायांवर कारवाईचे ‘तोंडी आदेश’ दिल्याची माहिती पुढे आली. मात्र ही कारवाई केवळ दिखावा होती. कोणतीही अधिकृत नोंद किंवा गुन्हा दाखल न करता, केवळ माध्यमांपासून बचाव करण्याचा हा प्रयत्न असल्याचे स्पष्ट होते.

बातमी प्रकाशित होताच, निरीक्षकांचे हप्ते वसुली करणारे कलेक्टर पुन्हा सक्रीय झाले. काहींना ‘सावध रहा’, काहींना ‘बाहेरून बंद, आतून सुरू’ अशा सूचनांची मालिकाच सुरू झाली. ही हालचालच सगळं काही पूर्ववत सुरू राहील, याची निशाणी होती.

एकंदरीत, शिरवळ पोलिस ठाण्याचे निरीक्षक हे कायद्यानुसार काम करणारे अधिकारी नसून, कायद्याच्या वरती बसून स्वतःच्या फायद्यासाठी पोलीस यंत्रणेचा वापर करणारे ‘सत्तांध’ अधिकारी असल्याचं पुन्हा अधोरेखित झालं आहे.

Previous Post

नव्याचे नऊ दिवस संपले!” ‘प्रोटोकॉलचा खेळ सुरू!’ ? भाग २

Next Post

Electric Shock News: विजेचा धक्का बसून पारगांव खंडाळा येथे एका तरुणाचा मृत्यू

Admin

Admin

Next Post

Electric Shock News: विजेचा धक्का बसून पारगांव खंडाळा येथे एका तरुणाचा मृत्यू

Stay Connected test

  • 23.9k Followers
  • 99 Subscribers
  • Trending
  • Comments
  • Latest
ब्रेकिंग न्यूज: शिरवळ एमआयडीसी परिसरात पूर्व वैमनस्यातून युवकाची निर्घृण हत्या

ब्रेकिंग न्यूज: शिरवळ एमआयडीसी परिसरात पूर्व वैमनस्यातून युवकाची निर्घृण हत्या

February 13, 2025
पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात: २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी

पुणे-सातारा महामार्गावर भीषण अपघात: २४ वर्षीय तरुणीचा मृत्यू, दुचाकीस्वार गंभीर जखमी

January 12, 2025
शिरवळमध्ये अवैध गुटखा उद्योगावर पोलिसांचा छापा – लाखोंचा साठा आणि यंत्रसामग्री जप्त

शिरवळमध्ये अवैध गुटखा उद्योगावर पोलिसांचा छापा – लाखोंचा साठा आणि यंत्रसामग्री जप्त

March 7, 2025
शिरवळ एसटी स्टँड येथे फळ विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला; विक्रेता गंभीर जखमी

शिरवळ एसटी स्टँड येथे फळ विक्रेत्यावर कोयत्याने हल्ला; विक्रेता गंभीर जखमी

February 22, 2025
ब्रेकींग! कॉंग्रेसला धक्का! मिलिंद देवरा यांचा मुंबई कॉंग्रेसला रामराम, शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश, वाचा सविस्तर

ब्रेकींग! कॉंग्रेसला धक्का! मिलिंद देवरा यांचा मुंबई कॉंग्रेसला रामराम, शिवसेना शिंदे गटात करणार प्रवेश, वाचा सविस्तर

0
शरद मोहोळचा ‘गेम’ करण्यासाठी दीड वर्षांपासून प्लॅनिंग; खून करण्यासाठी ८ जणांनी केला गोळीबाराचा सराव

शरद मोहोळचा ‘गेम’ करण्यासाठी दीड वर्षांपासून प्लॅनिंग; खून करण्यासाठी ८ जणांनी केला गोळीबाराचा सराव

0
शरद मोहोळ खूनप्रकरणी मोठी अपडेट! विठ्ठल शेलारसह रामदास मारणे पोलिसांच्या ताब्यात, पनवेलच्या फार्महाऊसवर छापे टाकत केली कारवाई

शरद मोहोळ खूनप्रकरणी मोठी अपडेट! विठ्ठल शेलारसह रामदास मारणे पोलिसांच्या ताब्यात, पनवेलच्या फार्महाऊसवर छापे टाकत केली कारवाई

0
First 50 boxes and 50 people on Davos tour, Uday Samant's strong response to Aditya Thackeray's criticism

‘उद्योगपतींच्या घराखाली बॉम्ब ठेवणारे उद्योग कसे वाढवणार’; आदित्य ठाकरेंच्या टीकेला उदय सामंतांचे जोरदार प्रत्त्युत्तर

0
शिरवळ ग्रामपंचायतीचा दारूबंदी व अवैध धंदेविरोधी निर्धार

शिरवळ ग्रामपंचायतीचा दारूबंदी व अवैध धंदेविरोधी निर्धार

September 12, 2025
दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक परप्रांतीय युवक जागीच ठार

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक परप्रांतीय युवक जागीच ठार

August 25, 2025
भोळीचे संजयसिंह चव्हाण परभणीचे जिल्हाधिकारी

भोळीचे संजयसिंह चव्हाण परभणीचे जिल्हाधिकारी

August 25, 2025

Electric Shock News: विजेचा धक्का बसून पारगांव खंडाळा येथे एका तरुणाचा मृत्यू

August 19, 2025

Recent News

Follow Us

Browse by Category

  • Blog
  • अपघात
  • आमची माती आमची माणसं
  • क्राईम
  • खंडाळा
  • ताज्या-बातम्या
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • रोजगार
  • संपादकीय
  • सातारा
  • सामाजिक

Recent News

शिरवळ ग्रामपंचायतीचा दारूबंदी व अवैध धंदेविरोधी निर्धार

शिरवळ ग्रामपंचायतीचा दारूबंदी व अवैध धंदेविरोधी निर्धार

September 12, 2025
दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक परप्रांतीय युवक जागीच ठार

दोन दुचाकींची समोरासमोर धडक, एक परप्रांतीय युवक जागीच ठार

August 25, 2025
  • About
  • Advertise
  • Privacy & Policy
  • Contact

© 2024 sataraprimenews.com.

No Result
View All Result
  • ताज्या-बातम्या
  • महाराष्ट्र
    • मराठवाडा
    • कोकण
    • खान्देश
    • पश्चिम-महाराष्ट्र
    • विदर्भ
  • राजकीय
  • क्राईम
  • सामाजिक
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • संपादकीय

© 2024 sataraprimenews.com.

error: Content is protected !!